मुळा धरण 75 टक्के भरण्याच्या मार्गावर

डिंभे 81 टक्के, माणिकडोह निम्मे
File Photo
File Photo

कोतूळ |वार्ताहर| Kotul

मुळा पाणलोटात कमी अधिक पाऊस होत असल्याने आवकही कमी अधिक होत आहे. असे असलेतरी 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सायंकाळी 19244 दलघफू (74टक्के) झाले असून आज रात्री उशीरापर्यंत 75 टक्के भरण्याची शक्यता आहे.

अकोले, राहुरी, नेवासा, शेवगाव, नगर, पाथर्डीच्या शेती, पिण्याचे पाणी, व्यापार तसेच नगरची एमआयडीचे भवितव्या मुळा धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असल्याने या धरणातील पाणीसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते.

या हंगामात मुळा धरणात केवळ 10502 दलघफू पाणी नव्याने दाखल झालेले आहे. गतवर्षीचा पाणीसाठा बर्‍यापैकी साठा असल्याने धरणातील पाणी 75 टक्क्यांवर आज जात आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 19105 दलघफू (74टक्के) झाला होता.

मुळा नदी सकाळी 3416 क्युसेकने वाहती होती. सायंकाळी 3822 क्यसुकेपर्यंत पाण्यात वाढ झाली होती.

डिंभे 81 टक्के, माणिकडोह निम्मे

कुकडी समूह धरणांमधील एकूण पाणीसाठा आता19401 दलघफू (65टक्के) झाला आहे. सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या 13500 दलघफू क्षमतेचे डिंभे धरणातील पाणीसाठा 81 टक्क्यांवर पोहचला आहे. माणिकडोहमधील पाणीसाठा 51 टक्के झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी या काळात या धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 21060 दलघफू (71 टक्के) होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com