मुळात 16500 दलघफू पाणीसाठा

मुळात 16500 दलघफू पाणीसाठा

कोतूळ |वार्ताहर| Kotul

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा आता 16500 दलघफू झाला होता. दरम्यान, मुळा पाणलोटात आषाढ सरींचा जोर ओसरल्याने मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 8769 क्युसेक होता.

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मुळा धरण.26000 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल रविवारी सायंकाळी 16500 दलघफू झाला होता. गत वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक साठा आहे.

कुकडी 60 टक्के

डिंभे 62 टक्के पिंपळगाव जोगे, माणिकडोहमध्ये 49 टक्के पाणीसाठा

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे,डिंभे धरणांमधील एकूण पाणीसाठा (17360 दलघफू) 60 टक्क्यावर गेला आहे. गत वर्षी याच काळात केवळ 5816 दलघफू (19.60टक्के) पाणीसाठा होता. पाणलोटात पावसाचा जोर कमी आहे. पण अधूनमधून कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरदर्‍यातून अजूनही पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 1214 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. येडगाव धरणात 94, माणिकडोह 48, वडज 75, पिंपळगाव जोगे 49, डिंभे 62 टक्के भरले आहे. आठ दिवसांत या प्रकल्पात सुमारे 15750 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान पाणलोटात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com