मुळा 60 टक्के भरण्याच्या मार्गावर

File Photo
File Photo

कोतूळ |वार्ताहर| Kotul

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 15000 दलघफू (57.67)टक्क्यांवर पोहचला होता. दरम्यान मुळा नदीतून 6270 क्युसेकने धरणात आवक होत होती. आज रात्री उशीरा हे धरण 60 टक्के होण्याची दाट शक्यता आहे.

File Photo
मुळा धरणात नगरच्या तरूणाचा बुडून मृत्यू

गत दोन दिवसांपासून पाणलोटात कमी अधिक पाऊस होत असल्याने नदीतील विसर्गही कमी अधिक होत आहे. काल रविवारी सकाळी 8779 क्युसेक विसर्ग होता. पण पाऊस की झाल्याने नदीतील विसर्गही कमी झाला. सायंकाळी कोतूळ येथील विसर्ग 6260 दलघफू झाला. गत बारा तासांत धरणात नव्याने 292 दलघफू पाणी दाखल झाले.

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मुळा धरण.26000 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल रविवारी सायंकाळी 15000 दलघफू झाला होता. गत वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक साठा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com