मुळा धरण 80 टक्के भरले

मुळा धरण 80 टक्के भरले

कोतूळ |वार्ताहर| Kotul

पाणलोटात पाऊस (watershed Rain) सुरू असल्याने दोन दिवसांत मुळा धरणात (Mula Dam) मुबलक पाणी आल्याने 26000 दलघफू क्षमतेचे हे धरण काल सायंकाळी 80 टक्के भरले. या धरणातील पाणीसाठा (Mula Dam Water Storage) 20800 दलघफूटावर पोहचला होता.

हरिश्चंद्र गड (Harishchandra Gad), आंबित (Ambit), कोतूळ (Kotul), आणि पारनेरात (Parner) पाऊस होत असल्याने दोन दिवसांत या धरणात तब्बल 1200 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 467 दलघफू पाणी दाखल झाले होते. त्यामुळे काल सकाळी या धरणातील पाणीसाठा (Mula Dam water Storage) 20670 दलघफू झाला होता. त्यानंतरही आवक सुरू असल्याने पाणीसाठा 20800 दलघफू झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com