मुळात किती आहे पाणीसाठा ? वाचा...

मुळात किती आहे पाणीसाठा ? वाचा...

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अकोले, राहुरीसह दक्षिण नगर जिल्ह्याला लाभदायक ठरणार्‍या मुळा धरणात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 525 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा सायंकाळी 16925 दलघफू (65 टक्के)झाला आहे. पाऊस काहीसा मंदावला असलातरी आज सकाळपर्यंत हा पाणीसाठा 17000 दलघफूवर गेलेला असेल.

मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगड परिसरात तीनचार दमदार बॅटिंग सुरू होती. त्यामुळे मुळा नदीत पाणी वाढत होते. पण काल सकाळनंतर पाऊस कमी-अधिक होत असल्याने कोतूळ येथील विसर्गही कमी-अधिक होऊ लागला आहे. काल रविवारी सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 6592 क्युसेक होता. सायकाळी तो 6951 क्युसेक होता. गत चार पाच दिवसांत मुळा धरणात नवीन पाण्याची जोमदार आवक झाली. या हंगामात 8046 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com