मुळा धरण 88 टक्के भरले

मुळा धरण 88 टक्के भरले

कोतूळ |वार्ताहर| Kotul

हरिश्चंद्र गड (Harishchandra Gad), आंबित (Ambit), पाचनई (Pachnai), कोतूळ (Kotul) भागात पावसाने जोरदार धरल्याने मुळा नदी (Mula River) दुथडी असून मुळा धरणात (Mula Dam) पाण्याची जोरदार आवक होत आहे. गत 12 तासांत 427 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने 26000 दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठा (Dam Water Storage) काल सायंकाळी 22543 दलघफू झाला होता. पाण्याची आवक सुरू असल्याने आज सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 22800 दलघफूच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे.

मुळा पाणलोटात (Mula watershed) गत 20 दिवसांपासून फारसा पाऊस होत नसल्याने आवक मंदावली होती. पण गत चार दिवसांपासून सरी जोरदार कोसळत असल्याने नदीला पाणी वाढू लागले आहे. शनिवारी रात्री पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. त्यामुळे मुळा नदीचे पाणी वाढले होते. रविवारी सकाळी कोतूळ (Kotul) येथील मुळा नदीचा (Mula River) विसर्ग 11152 क्युसेक होता. दुपारनंतर काहीसा पाऊस कमी झाल्याने सायंकाळी नदी 8028 क्युसेकने वाहत होती. पाऊस कायम राहिल्यास चार-पाच दिवसांत हे धरणही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी असल्याचे दृष्य पहायला मिळत आहे. या पावसाचा लाभ भातपिकांना होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com