मुळा 56 टक्के भरले

मुळा 56 टक्के भरले

कोतूळ |वार्ताहर| Kotul

पाणलोटातील हरिश्चंद्र गड (Harishchandra Gad), पाचनई (Pachnai), आंबित (Ambit) व अन्य भागात आषाढ सरी अधूनमधून जोरदार बरसत असल्याने मुळा धरणात (Mula Dam) पाण्याची आवक होत आहे. या धरणातील पाणीसाठा (water Storage) 56 टक्के झाला आहे.

मुळा धरणात (Mula Dam) काल गुरूवारी सकाळी 6260 क्युसेकने आवक होत होती. त्यानंतर सायंकाळी घट झाली. कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 504 क्युसेक होता. तर साठा 14435 दलघफू होता. रात्री उशीरा या साठ्यात वाढ होऊन तो 14550 दलघफू झाला होता.

पाणलोटात पाऊस असल्याने भात लागवड सुरू आहे. भातखाचारांमध्ये पाणी असल्याने ही पिके तरारली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com