मुळा 80 टक्के भरले
सार्वमत

मुळा 80 टक्के भरले

निळवंडेतून 7861 क्युसेकने विसर्ग सुरू

Arvind Arkhade

कोतूळ, भंडारदरा |वार्ताहर|Kotul

पाणलोटात कालपासून पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्याने 8373 क्युसेकने आवक होत आहे. त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या धरणात काल सायंकाळी 20500 दलघफू (78.85 टक्के) साठा झाला होता. पहाटेपर्यंत या धरणातील पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे सरकलेला असेल.

दोन दिवसांपूर्वी पावसाने मुळाच्या पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई या भागात काहीशी विश्रांती घेतली होती. पण अधूनमधून बरसणार्‍या सरींमुळे धरणात नव्याने पाण्याची आवक सुरूच होती. मुळा धरणात गत 24 तासांत 321 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. आवक लक्षात घेता आज या धरणातील पाणीसाठा 20000 दलघफूपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने येणारी आवक निळवंडे धरणात सोडण्यात येत आहे. गत सायंकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरा धरणात 341 दलघफू पाणी आले. ते पाणी निळवंडेत सोडण्यात आले. भंडारदरात सध्या 10694 दलघफू (96.87टक्के)पाणीसाठा आहे. याधरणातून 6640 क्युसेकने पाणी निळवंडे धरणात येत आहे. तर निळवंडेतून 7861 क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ओझर ओव्हरफ्लो 8717 क्युसेकने सुरू आहे.

डिंभे 81, घोडमध्ये 75 टक्के पाणीसाठा

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी धरण समुहातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक झाला आहे. या प्रकल्पात सुमारे 65 टक्के पाणीसाठा झाला आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठा काल सकाळी 10125 द्लघफू (81 टक्के) झाला होता.

सुमारे बाराशे दलघफू क्षमतेच्या वडज धरणातील पाणीसाठा 1043 दलघफू (89 टक्के)होता. पाण्याची आवक होत असल्याने या धरणातून मीना नदीत व कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. माणिकडोह आणि पिंपळगाव जोगे धरणातही आवक होत आहे. पिंपळगाव जोगे धरणात मृत पाणीसाठा होता तो आता उपयुक्त साठ्यात आला आहे.

689 दलघफू पाणीसाठा या धरणात असून माणिकडोडमध्ये 3288 दलघफू (32.30 टक्के) पाणी आहे. घोड धरणातील पाणीही वाढत असून 4490 दलघफू (75 टक्के)पाणीसाठा झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com