मुळा धरण 75 टक्क्यावर
सार्वमत

मुळा धरण 75 टक्क्यावर

Arvind Arkhade

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दक्षिण नगर जिल्ह्याची जलदायिनी व 26 हजार दलघफूट पाणी साठवण क्षमतेचे मुळा धरण 75 टक्के भरले आहे. आज सायंकाळी 6 वाजता पाणीसाठा 19 हजार 579 दशलक्ष घनफूट झाला आहे.

सध्या मुळा धरणात 5 हजार 638 क्यूसेस पाण्याची आवक सुरू आहे. यंदा नव्याने पाणी जमा झाले बारा हजार दशलक्ष घनफूट आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com