करंजी |वार्ताहर|Karanji

पाथर्डी तालुक्यासह नगर राहुरी तालुक्यातील 45 गावांमधील 102 पाझर तलावासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या वांबोरी चारीसाठी या भागाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले.

पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावापर्यंत या योजनेचे पाणी पोहोचले असल्याची माहिती माजी सभापती संभाजी पालवे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पालवे यांनी सांगितले की तीन महिन्यापूर्वी देखील मुळा धरणातून वांबोरीचारीसाठी पाणी सोडण्यात आले होते. त्या पाण्यातून देखील अनेक पाझर तलाव बंधार्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवून राहिले व शेतकर्यांना या पाण्याचा लाभ झाला.या अगोदर मिळालेले पाणी मुळाधरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे प्राधान्याने सोडण्यात आले होते.

आता पुन्हा एकदा मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी हक्काचे पाणी सुरू करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांसह शेतकर्यांकडून आमदार तनपुरे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री तनपुरे यांनी मुळा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश जलसंधारण विभागाच्या अधिकार्यांना दिल्याने वांबोरी चारी योजनेअंतर्गत येणार्या लाभधारक शेतकर्यांना आपल्या हक्काचे 680 एमसीप्टी पाणी मिळणार असून शंभर दिवस हे पाणी सुरू राहणार आहे.