मुळा धरणातून 1085 क्युसेकने विसर्ग

मुळा धरणातून 1085 क्युसेकने विसर्ग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस कमी झाल्याने धरणात होणारी आवक लक्षात घेता सोमवारी रात्री 11 वाजता मुळा धरणातून विसर्ग 1085 क्युसेकपर्यंत घटविण्यात आला. धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाने केले आहे.

दरम्यान 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सायंकाळी 25650 दलघफू पाणीसाठा होता. सायंकाळी 6 वाजता मुळा धरणातून 2170 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. ते रात्री कमी करण्यात आले. उजव्या कालव्यातून एक हजार क्युसेकने पाणी सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com