मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट न केल्यास ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार

मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट न केल्यास ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची तरतूद असतानाही मागील 60 वर्षांत नोकरीत समाविष्ट करण्यात आले नाही. शासकीय सेवेत समाविष्ट करावे या मागणीसाठी तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मुळा धरणग्रस्तांनी दिला आहे. कृती समितीचे उपाध्यक्ष ठकाजी बाचकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मुळाधरण ग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची तरतूद असतानाही गेल्या 60 वर्षांपासून शासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही. यापासून मुळा धरणग्रस्तांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले तरी, प्रकल्पग्रस्तांच्या नेमणुकीचे तत्कालीन धोरणे विचारात घेऊन शासन निर्णयामधील तरतुदीनुसार शासकीय नोकरी उपलब्ध करून वर्ग-3 व वर्ग-4 व महात्मा फुले कृषी विद्यापिठात तरतुदीनुसार सेवेत सामावून घ्यावे.

अन्यथा नेवासा तालुक्यातील पानेगाव, करजगाव, अमळनेर, निंभारी, वाटापूर, गोमळवाडी, तामसवाडी या ग्रामपंचायतीचा येणार्‍या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकणारा ठराव ग्रामसभेत मंजूर झालेला आहे. तरी पुढील काळात काही ग्रामपंचायतीचे ठराव मंजूर होणार आहे. तरी शासन दरबारी न्याय मिळवून द्यावा.

यावेळी योगेश्वर मारुती कोळवे ,किरण खंडू वरकडे, शशिकांत जालिंदर शेडगे, लिंबाजी गंगाधर होडगर, नानासाहेब गीताजी होडगर, गिताराम भाऊसाहेब बाचकर, ज्ञानदेव तुळशीराम बाचकर, गोरक्ष बाळासाहेब बाचकर सुनील वडितके, अनिल शिवराम डोईफोडे, संदीप मुक्ताजी डोईफोडे, बाबासाहेब तबाजी बाचकर, दादासाहेब कोळेकर, राहुल राजेंद्र पिसाळ, घोषिराम बाबुराव बाचकर, लखन बाचकर, ज्ञानदेव किसन गलांडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com