मुळा धरणात श्रीरामपूरच्या तरूणाचा बुडून मृत्यू

धरणात बुडण्याच्या घटना वाढल्या || अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
मुळा धरणात श्रीरामपूरच्या तरूणाचा बुडून मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मुळा धरणाच्या (Mula Dam) पाण्यात पोहोण्यासाठी (swim) गेलेल्या श्रीरामपूर (Shrirampur) येथील अविवाहित तरूणाचा बुडून मृत्यू झाला (The Young Man Drowned). दरम्यान, या घटनेची राहुरी पोलीस (Rahuri Police) आणि पाटबंधारे खात्याच्या (Irrigation Department) अधिकार्‍यांना माहितीदेखील नव्हती. स्थानिक नागरिकांनी त्या तरूणाचा मृतदेह वर काढून राहुरी (Rahuri) येथील खासगी रूग्णालयात नेला असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी रमजान ईदच्या (Ramadan Eid0 दिवशीच एका मुस्लिम युवकाचा मृत्यू (Death) झाल्याने श्रीरामपूरात (Shrirampur) हळहळ व्यक्त होत आहे.

मुळा धरणात श्रीरामपूरच्या तरूणाचा बुडून मृत्यू
डागडुजीअभावी लोखंडी फॉल धबधबा नामशेष होण्याच्या मार्गावर

दरम्यान, मुळा पाटबंधारे खात्याच्या (Mula Irrigation Department) अधिकार्‍यांच्या बेपर्वाईमुळे मुळा धरण (Mula Dam) भागात बुडून मृत्यू (Drowning Death) पावलेल्यांची संख्या वाढली असून या बेजबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मुळा धरणात श्रीरामपूरच्या तरूणाचा बुडून मृत्यू
आपले खासदार तोंडच उघडत नाहीत !

मुळा धरण (Mula Dam) परिसरात चमेरी विश्रामगृहानजिक काही तरूण मुळा धरण (Mula Dam) बघण्यासाठी आले होते. श्रीरामपूरला (Shrirampur) दुपारी ईदची नमाज पठण केल्यानंतर ते मुळा धरणावर आले होते. विश्रामगृहाच्या पायथ्याशी काही तरूणांनी धरणात उडी मारली. त्यात एकजण बुडाला. त्याला अन्य तरूणांनी वाचविले. मात्र, दुसरा तरूण पाण्यात दिसेनासा झाला. त्याला शोधण्यासाठी तरूणांनी उड्या मारल्या. मात्र, त्यांना तो मिळून आला नाही. अखेर त्या ठिकाणी अशोक भोसले, गणेश पाटोळे, सागर दुधाडे, नितीन साळुंके, यांनी पाण्यात उड्या मारून बेपत्ता तरूणाचा शोध घेतला. काही प्रयत्नानंतर तो त्यांच्या हाती लागला. त्याला तातडीने राहुरी (Rahuri) येथील रूग्णालयात (Hospital) नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मुळा धरणात श्रीरामपूरच्या तरूणाचा बुडून मृत्यू
धानोरे-सोनगाव पाणी योजनेसाठी 20 कोटी 36 लाखाची मान्यता- ना. तनपुरे
मुळा धरणात श्रीरामपूरच्या तरूणाचा बुडून मृत्यू
वनविभागाने जप्त केलेल्या म्हैसगावच्या मुद्येमालावर चोरांनी मारला डल्ला

मुळा धरणावर पोहोण्यासाठी परवानगी नसतानाही पाटबंधारे अधिकार्‍यांबरोबर आर्थिक देवाणघेवाण करून अनेक हौसी पर्यटक आपली पोहोण्याची हौस भागवून घेतात. यातच अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी कठोर निबर्ंध लावून उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, संबंधित अधिकार्‍यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची तक्रार होत आहे. पोहण्याची बेकायदा परवानगी देण्यासाठी खुलेआम आर्थिक साटेलोटे केले जात असल्याची चर्चा होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com