मुळा धरण आज पूर्ण भरण्याची शक्यता

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मुळा धरण आज पूर्ण भरण्याची शक्यता

राहुरी | तालुका प्रतिनिधी | Rahuri

मुळा धरणाची क्षमता 26 हजार दशलक्ष घनफूट असून पाणलोट क्षेत्रात सातच्या पावसाने साधारणपणे 4227 क्यूसेकने धरणाकडे

राहुरी तालुक्यासह नगर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव आदी तालुक्यांसाठी वरदान ठरलेले मुळा धरण आज पूर्ण भरण्याची शक्यता आहे. धरणातून कोणत्याही क्षणी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. मुळा धरण भरल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. यावर्षी लाभ क्षेत्र भरपूर पाऊस झाल्यामुळे विहिरी, बोरवेल भरभरून वहात आहेत. मुळा धरणाची क्षमता 26 हजार दशलक्ष घनफूट असून पाणलोट क्षेत्रात सातच्या पावसाने साधारणपणे 4227 क्यूसेकने धरणाकडे पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी सायंकाळपर्यंत 24,984 इतकी झाली असल्याची माहिती धरण अभियंता श्री आंधळे यांनी दिली आहे. धरणाच्या पाणी साठ्यावर पाणी पाटबंधारे खात्याचे पूर्णपणे लक्ष असून एकूण 25 हजार 400 धरण पातळी झाल्यानंतर मुळा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com