मुळा धरण निम्मे भरले ; 22 वर्षांच्या इतिहासात ही बारावी वेळ

मुळा धरण निम्मे भरले ; 22 वर्षांच्या इतिहासात ही बारावी वेळ

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दक्षिण नगर जिल्ह्याला (South Nagar district) जलसंजीवनी देणार्‍या 26 हजार दलघफूट पाणीसाठवण क्षमतेचे मुळा धरण (Mula Dam) रविवारी (दि.25) रात्री निम्मे भरले आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात 13 हजार दलघफूट पाणीसाठ्याची (Water Storage) नोंद झाली आहे. सध्या धरणात पाणलोटातून आवक सुरू असल्याने मुळा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ (Rapid rise in water level of Mula dam) होत आहे. विशेष म्हणजे धरणाच्या गेल्या 22 वर्षांच्या इतिहासात (history of 22 years) केवळ जुलै महिन्यातच हे धरण निम्मे भरण्याची ही बारावी वेळ आहे. तर ऑगस्टमध्ये तब्बल नऊवेळा धरण निम्मे भरलेले आहे. दरम्यान, मुळा धरणाचा पाणीसाठा जलदगतीने वाढत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

रविवारी सायंकाळी मुळा धरणात 12 हजार 837 इतका दलघफूट पाणीसाठा जमा झाला होता. पाण्याची आवक 6 हजार 260 इतकी सुरू असल्याने रविवारी रात्रीच धरणात क्षमतेच्या निम्मा पाणीसाठा जमा झाला आहे. रविवारी रात्रीनंतर मुळा धरणाच्या पाणीसाठ्याने 13 हजारांची पातळी ओलांडल्याने धरणाची पूर्णक्षमतेने भरण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुळा धरण ऑगस्ट महिन्यातच दोनवेळा पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. सन 2019 मध्ये 1 ऑगस्टला, सन 2020 रोजी 7 ऑगस्टला धरण निम्मे भरले होते.

दि. 31 जुलै या तारखेला सन 2004, 2008, 2010, 2012 या वर्षी मुळा धरणात भरपावसाळ्यात निच्चांकी पाणीसाठा शिल्लक होता. दरम्यान, दि. 3 ऑगस्ट 2006 साली धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात दमदार आवक सुरू होऊन धरण ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या 21 वर्षांच्या मुळा धरणाच्या इतिहासात हे धरण 15 वेळा पूर्णक्षमतेने भरले असून सहावेळा ते भरलेले नव्हते. चार तालुक्यांतील सुमारे 75 हजार हेक्टर शेती मुळा धरणाच्या ओलिताखाली येते. तर राहुरी, देवळाली प्रवरासह नगर व सुपा या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com