मुळा धरणात एक जण बुडाला

दुसर्‍याला वाचविण्यात मासेमारी करणारांना यश
मुळा धरणात एक जण बुडाला

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील (Rahuri) एका हॉटेलमध्ये काम करणारे चार जण स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा (Independence Day holiday) आनंद लुटण्यासाठी मुळा धरण (Mula Dam) पाहण्यासाठी गेले होते. त्यापैकी, दोन जणांना थेट धरणाच्या पाण्यात पोहण्याचा (Swimming in the Dam water) मोह झाल्याने ते पाण्यात उतरले. मात्र खोल पाण्यात दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. धरणात मासेमारी करणार्‍या तरुणांनी प्रयत्न करत एकाला वाचविले. दुसरा सवंगडी विस्तारलेल्या अथांग पाण्यात गायब झाला. त्याचा मृतदेह (Dead Body)काल (सोमवारी) सायंकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला.

रावसाहेब भीमराज मते (वय 40, रा. मुलनमाथा, राहुरी) असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड) यास धरणात मासेमारी करणार्‍या तरुणांनी बुडताना वाचविले.

हे दोघे पाण्यात बुडताना (Drowning) पाहून मासेमारी करणारे विकास गंगे व इंद्रजीत गंगे मदतीला धावले. त्यांनी बिरेंदरसिंग रावतला बुडताना वाचविले. तोपर्यंत मते पाण्यात गायब झाला होता. काठावर उभे राहून दुर्घटना पाहणार्‍या त्यांच्या दोन सहकार्‍यांनी घाबरुन धूम ठोकली. घटनास्थळी शेकडो पर्यटक बघ्यांची गर्दी जमली. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ (Police Inspector Nandkumar Dudhal) यांना घटनेची माहिती समजताच दुपारी तीन वाजता पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, कॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण, संजय शिंदे घटनास्थळी दाखल झाले.

धरणात मासेमारी करणारे लहू बर्डे, अशोक गायकवाड, किशोर बर्डे, विकास गंगे, इंद्रजीत गंगे, चंदू बर्डे, शक्तीलाल गंगे, करण सूर्यवंशी यांच्या मदतीने होडीतून व ट्यूबच्या साह्याने पाण्यात गळ टाकून शोध घेण्यात आला. अंधार पडल्यावर शोधमोहीम थांबविण्यात आली. काल सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. दिवसभारच्या शोध कार्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रावसाहेब मते याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

मुळा धरणाच्या (Mula Dam)चमेली अतिथीगृहाकडे पर्यटक जाऊ नयेत. यासाठी खंदक करून, वृक्षारोपण करण्यात आले. परंतु, पर्यटकांनी (tourists) खंदक बुजवून पुन्हा रस्ता तयार केला. तेथे फलक लावून, पर्यटकांनी पाण्यात उतरू नये. यासाठी धोक्याचा इशाराही दिलेला आहे. असे असताना पर्यटक त्याकडे दुर्लक्ष (Ignore) करतात. त्यामुळे दुर्घटना घडतात.असे मुळा धरण (Mula Dam) शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com