मुळाधरणाच्या विज प्रकल्पा जवळील कालव्यात तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

मुळाधरणाच्या विज प्रकल्पा जवळील कालव्यात  तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) तालुक्यातील मुळा धरणाच्या (Mula Dam) भिंती जवळील उजव्या कालव्यावरील (Canal) वीज निर्मिती प्रकल्पाच्या (Power Generation Project) नजीक कालव्यात दिनांक 16 जून 2023 रोजी दुपारी पोहण्यासाठी (Swim) पाण्यात उतरलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Youth Death by Drowning) झाला. आकाश दगडू पवार (वय 22 वर्षे, रा. बारागाव नांदूर) असे मृत तरूणाचे नाव आहे.

मुळाधरणाच्या विज प्रकल्पा जवळील कालव्यात  तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
एसटी बसची मोटारसायकलला धडक

दिनांक 16 जून 2023 रोजी दुपारी एक वाजता मुळा धरणाच्या (Mula Dam) उजव्या कालव्यात पोहण्यासाठी आकाश पवार व त्याचे दोन पुतणे पाण्यात उतरले होते. कालव्यातून सिंचनासाठी 1250 क्युसेकने विसर्ग सुरू होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे आकाशची पाण्यात दमछाक झाली. नाकातोंडात पाणी गेल्याने आकाश गटांगळ्या खायला लागला. त्याच्या सोबतच्या पुतण्यांनी आरडाओरड केला. परंतु आकाश पाण्यात (Water) दिसेनासा झाला. त्याच्या पुतण्यांनी परिसरातील काही लोकांना घटनेची माहिती दिली.

मुळाधरणाच्या विज प्रकल्पा जवळील कालव्यात  तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
स्वस्तीक चौकातील मोबाईल दुकान फोडले

माजी जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज गाडे, नाना देवकर, रियाज इनामदार, शुभम देवकर आदींसह ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुळा पाटबंधारेच्या (Mula Irrigation) अधिकार्‍यांना घटनेची माहिती कळविण्यात आली. परंतु उपविभागीय अधिकारी शरद कांबळे यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने कर्मचार्‍यांना कालव्याचा विसर्ग कमी करण्याच्या सुचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांमध्ये संताप पसरला. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अखेर मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या आदेशाने कालव्याचा विसर्ग टप्प्या टप्प्याने कमी करून सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात आला. कालव्यातील (Canal) पाणी कमी झाल्यावर ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली.

मुळाधरणाच्या विज प्रकल्पा जवळील कालव्यात  तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
अलिखित करार मोडणार्‍यांचे पुढे ठरवू ; मंत्री विखे यांचा गर्भित इशारा

एक तासाच्या शोध कार्यानंतर सायंकाळी सहा वाजता घटना स्थळापासून तीनशे मीटर अंतरावर कालव्यातील पाण्यात आकाशचा मृतदेह (Dead Body) सापडला. आकाशच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

मुळाधरणाच्या विज प्रकल्पा जवळील कालव्यात  तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
दूध भेसळ विरोधात कारवाई करण्याचे निर्देश

मुळा पाटबंधारेच्या अधिकार्‍यांना दुपारी एक वाजता घटनेची माहिती कळवून उजवा कालवा बंद करण्यास सांगितले. परंतु त्यांनी चार तास दखल घेतली नाही. माणुसकीला काळीमा फासला. संतप्त ग्रामस्थांसह धरणावर गेल्यावर सायंकाळी पाच वाजता कालवा बंद करण्यात आला. असे माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी सांगीतले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com