मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी
File Photo

राहुरी |तालुका प्रतिनिधी\ Rahuri

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी पिकांसाठी त्वरित आवर्तन सोडण्याची मागणी लाभधारक शेतकर्‍यांकडून होत आहे.

मुळा धरणाच्या डाव्या कालव्याखालील मोमीन आखाडा, कनगररोड, वाघाचा आखाडा, टाकळीमिया, मुसळवाडी येथील टेलपर्यंतच्या भागात पाणी पातळी पूर्णपणे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पुरेसा पाऊस झाल्यामुळे मुळा धरण ओसंडून जायकवाडीकडे जवळपास धरण पूर्ण भरून दहा टीएमसी पाणी नदीतून वाहिले.आजही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.

शेतकर्‍यांच्या गहू, कांदा, हरभरा, आदी रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्यानंतर आता ही पिके पाण्यावर आली आहेत. विहिरीची व कुपनलिकांची पाणी पातळी पूर्णपणे खोलवर गेली असल्याने या भागातील शेतकर्‍यांना तसेच डाव्या कालव्याखालील सर्वच भागात पाण्याची गरज आहे. याबाबत माजी खा. प्रसादराव तनपुरे यांनी पालकमंत्र्यांनी त्वरेने कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्याची मागणी केलीच आहे.

अनेक शेतकर्‍यांच्या कांदा लागवडी खोळंबल्या आहेत. तरी याबाबत सिंचन विभागाने त्वरेने बैठक घेऊन डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी एमपी सोसायटीचे माजी चेअरमन गोरक्षनाथ उंडे, दिलीप उंडे, महेश तनपुरे, विलास तनपुरे, दीपक शिंदे, बाबासाहेब येवले, नंदू तनपुरे, राजेंद्र काळे, ज्ञानदेव काळे, यांच्यासह डौले वस्ती, काळे आखाडा, वाघाचा आखाडा, येवले आखाडा, जोगेश्वरी आखाडा आदींसह शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com