मुळा धरण 60 टक्के भरण्याच्या मार्गावर

भंडारदरात 83 टक्के पाणी, निळवंडे निम्मे होणार
मुळा धरण 60 टक्के भरण्याच्या मार्गावर

कोतूळ, भंडारदरा |वार्ताहर| Kotul

पाणलोटातील हरिश्चंद्र गड (Harishchandra Gad), पाचनई (Pachnai) , आंबित (Ambit) व अन्य भागात आषाढ सरी अधूनमधून जोरदार बरसत असल्याने मुळा धरणात (Mula Dam) पाण्याची आवक वाढली असून हे धरण 60 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा (Water Storage) 14897 दलघफू होता. तर धरणात पाण्याची आवक (Dam Water inward) 9393 क्युसेकने सुरू आहे.

गत दोन दिवसांपासून आषाढ सरींचे तांडव सुरू असल्याने परिसर जलमय झाला आहे. डोंगरदर्‍या, रस्ते धुक्याने झाकून गेले आहे. जोडीला गार वारा असल्याने जनजीवन गारठून गेले आहे. जनावरांचे हाल होत आहे. संततधार पावसात शेतकर्‍यांना भात आवणी करावी लागत आहे.

पाणलोटात अधूनमधून धो-धो पाऊस कोसळत असल्याने मुळा नदीतील (Mula River) विसर्ग कमी अधिक होत आहे. शुक्रवारी सकाळी या नदीतील कोतूळ येथील विसर्ग 10026 क्युसेक होता. त्यात काहीशी घट होत तो सायंकाळी 9393 क्युसेक झाला. रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू असल्याने आज धरणात पाण्याची चांगली आवक होणार आहे.

शिवाजीरा आज-उद्या हे धरण 60 टक्के भरलेले असेल. भंडारदरा पाणलोटातही पावसाचा जोर सुरू आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 9148 (82.87 टक्के) होता. काल दिवसभरात 57 मिमी पाऊस पडला. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 1262 क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. वाकी तलावातूनही (Waki Pond) 1022 क्युसेक विसर्ग सुरू आहे. अन्य पाणीही जमा होत असल्याने निळवंडे धरणातील (Nilwande Dam) पाणीसाठा वाढू लागला आहे. 8320 दलघफू क्षमतेच्या या धरणात सायंकाळी पाणीसाठा 3686 (44.30 टक्के) झाला होता. त्यात वाढ सुरू असल्याने हे धरणही लवकरच निम्मे भरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com