मुळा कालव्याच्या दुरूस्तीसाठी आणखी 1 कोटी 77 लाखांच्या प्रस्तावास मंजुरी

File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील मुळा डावा कालव्याच्या सा.क्रं. 17 ते 25 किमी अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत 1 कोटी 77 लाख 12 हजार 852 रूपयांच्या खर्चाच्या विशेष दुरूस्ती प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

मुळा नदीवर राहुरी तालुक्यात मुळा धरण 1974 मध्ये बांधण्यात आले. त्यानंतर उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे शेतीसाठी पाणी देण्यात येत आहे. पण या कालव्यांवरील प्रमुख बांधकामाची मोठी दुरूस्ती करण्यात आलेली नाही. कालव्यांद्वारे तसेच वितरीकेद्वारे सिंचन करत असताना सदर बांधकामातून मोठ्या प्रमाणात गळती होत असून त्यामुळे वहनव्यय वाढून सिंचन व्यवस्थापन विस्कळीत होत आहे. त्यामुळे कालव्याची ही दुरूस्ती झाल्यास 1570 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

यापूर्वी मुळा धरणाच्या डाव्या कालव्याच्या 0 ते 17 किमी मधील 4 कोटी 54 लाख 67 हजार 494 रुपये खर्चाच्या विशेष दुरूस्ती प्रस्तावास आणि डाव्या कालव्याच्या अंतिम वितरीका 16/ 560 किमी मधील 1 कोटी 88 ला 44 हजार 207 रूपये एवढ्या खर्चाच्या विशेष दुरूस्ती प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com