फुटलेल्या मुळा कालव्याच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण

फुटलेल्या मुळा कालव्याच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील देवगाव येथे निकम वस्तीजवळ दि.15 जुलै रोजी पहाटे फुटलेल्या मुळा उजवा कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याची माहिती चिलेखनवाडी उपविभागाचे सहाय्यक अभियंता प्रवीण दहातोंडे यांनी दिली.

भेंडा-कुकाणा व इतर सहा गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी मुळा उजव्या कालव्यातून मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले असता दि.15 जुलै रोजी पहाटे 3 वाजता हा कालवा देवगाव येथे फुटल्यामुळे कालव्यातील लाखो लिटर पाणी वाया जाऊन पिकांचे नुकसानही झाले होते. सतत पाऊस चालू असल्याने प्रत्यक्ष कालवा दुरुस्तीचे काम दि.21 जुलै रोजी सुरू करण्यात आले. यासाठी जलसंपदा विभागाचे नाशिक येथून एक पोकलँड, एक जेसीबी, तीन डंपर, एक रोलर अशी यंत्रसामुग्री मागविण्यात आली होती.

या यंत्रांच्या सहाय्याने कालवा दुरुस्तीचे काम आठ दिवसांत पूर्ण करून पाणी वहनासाठी कालवा तयार करण्यात आला आहे. कालवा दुरुस्तीसाठी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गर्दशनाखाली चिलेखनवाडी उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी-1 प्रवीण दहातोंडे, कुकाणा सिंचन शाखेचे शाखाधिकारी श्री. खर्से, कालवा निरीक्षक दरंदले, श्रीकांत करंजे यांनी कालवा भराव दुरूस्तीचे काम पूर्ण केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com