
वळण |वार्ताहर| Valan
मुळा धरणातून मुळा डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकर्यांनी शेतामध्ये ऊस, घास, मका, कांदे आदी पिके आपल्या शेतात घेतली असून सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पिके पाण्यापासून वाचून करपू लागले आहेत.
पूर्व भागातील शेतकर्यांनी जास्त ऊस खोडवा राखलेला आहे. त्याला पाणी नसल्यामुळे खोडकिडा पडायला सुरुवात झाली आहे. एकीकडे विजेची लोड शेडिंग सुरू आहे. त्यामुळे विहिरीला व बोरला पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही.
त्यासाठी मुळा धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी पूर्व भागातील गावातील शेतकरी सिताराम गोसावी, अॅड.आशिष बिडकर, पांडुरंग जगताप, नारायणराव टेकाळे, बाळासाहेब पवार, दाजीबा जाधव आदींनी केली आहे.