मुळा डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने आवर्तन सोडले

मुळा डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने आवर्तन सोडले

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

नगर जिल्ह्याची जिवनदायीनी म्हणून ओळख असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने तिसरे उन्हाळी आवर्तन काल सोडण्यात आले.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा निम्मा झालेला आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी तिसरे आवर्तन सोडण्यात आले असून हे आवर्तन सुमारे 18 दिवस चालणार आहे. पाणी सोडल्याने सुमारे 3 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणात सध्या 12 हजार 980 दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक असून त्यापैकी 8 हजार 480 इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

पैकी उजव्या कालव्यातून देखील शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. त्यातून सुमारे पाच हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपयोगात येणार आहे. मुळा धरण सलग तीन वर्षापासून पूर्ण क्षमतेने भरले आहे. यंदा मुळा धरणात वाढीव पाणीसाठा दीड हजार दशलक्ष घनफूट शिल्लक राहणार आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com