भंडारदरा 39 टक्के तर वाकी तलाव ओव्हरफ्लो

निळवंडे व मुळात एवढा पाणीसाठा
वाकी तलाव
वाकी तलाव

अकोले |प्रतिनिधी| Akole

मुळा-भंडारदरा पाणलोट (Mula -Bhandardara Watershed) क्षेत्रात मुसळधार (Rain) पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले, धबधबे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहे. त्यामुळे कृष्णवंती नदीवरील (Krushanwanti River) वाकी लघु पाटबंधारे तलाव (Waki Pond) आज शनिवारी दुपारी पुर्ण क्षमतेने भरला आहे.

या प्रकल्पाची एकुण साठवण क्षमता 112 दलघफू आहे. हा लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो (Waki Pond Overflow) झाल्यामुळे निळवंडे (Nilwande) जलाशयाचा पाणीसाठा (Water Storage) वाढण्यास मदत होणार आहे. मुळा पाणलोट क्षेत्रात सुरू असणार्‍या पावसामुळे मुळा नदीवरील 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणही (Pimpalgav Khand Dam) बुधवारी ओव्हरफ्लो झाले.

दरम्यान अकोले (Akole) शहर, परिसरात आज दुपारपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. दुपार पासून कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. गेल्या दोन आठवड्या पासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. आजच्या या पावसामुळे शेतकर्‍यांची खोळंबलेली शेतीची कामे सुरू होऊ शकतील.

मुळा-भंडारदरा पाणलोट (Mula -Bhandardara Watershed) क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे भातशेतीला संजीवनी मिळाली आहे. तसेच धरणातही नवीन पाण्याची आवक वाढू लागली आहे.

जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्राला मात्र संततधार पाऊसास सुरु झाल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे आदिवासी शेतकरी बांधवांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी सुकून चाललेल्या भातरोपांना देखील नवसंजीवनी मिळाली आहे. कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला, तर निसर्ग सौंदर्य देखील हळूहळू खुलू लागले आहे. या पावसाच्या पाण्याने डोंगर दर्‍यातील झरे वाहते झाले आहे.

दरवर्षी प्रथम भंडारदरा पाणलोट क्षेत्रात व मुसळधार पाऊस पडतो. त्यावेळी उर्वरित जिल्हा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असतो. यंदा मात्र जिल्हाभर पाऊस कोसळत असताना भंडारदरा पाणलोट क्षेत्र पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून पावसाला सुरुवात झाली आहे. भंडारदरा धरणात 4305 दलघफू तर निळवंडे धरणात 3755 दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक होता. कोतूळची आवक दोन हजार क्युसेकने सुरू होती. पिंपळगाव खांड धरण भरल्यामुळे मुळा धरणातील पाण्याच्या साठ्यातही झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

आजचे पाणीसाठे व क्षमता

भंडारदरा - 4305/11039

निळवंडे - 3755/8320

मुळा - 8617/26000

आढळा - 413/1060

मागील 24 तासात पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढील प्रमाणे -

रतनवाडी - 139

घाटघर - 112

भंडारदरा - 96

वाकी - 73

निळवंडे - 9

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com