मुळा-निळवंडे धरण कालव्यावरील उपसा सिंचन योजनाच्या सर्वेक्षणासाठी 2 कोटी 37 लाखांहून अधिक निधी

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची माहिती
मुळा-निळवंडे धरण कालव्यावरील उपसा सिंचन योजनाच्या सर्वेक्षणासाठी 2 कोटी 37 लाखांहून अधिक निधी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) मुळा धरणाच्या (Mula Dam) जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या व उजव्या कालव्यावरील (Canal) एकूण 17 उपसा सिंचन योजनांचे (Upsa Irrigation Schemes) प्राथमिक सर्वेक्षण (Preliminary Survey) करण्यात येणार असून यासाठी 2 कोटी 37 लाखांहून अधिक निधी (Fund) उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Minister of Soil and Water Conservation Shankarrao Gadakh) यांनी दिली.

ना.गडाख (Minister of Soil and Water Conservation Shankarrao Gadakh) पुढे म्हणाले,101 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता (Irrigation Capacity) असलेल्या 17 योजनांसाठी एकूण 3,900 हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी 2 कोटी 37 लाख 31 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

योजनांचे सर्वेक्षण करण्याबरोबरच उपसा सिंचन योजनांच्या (Upsa Irrigation Scheme) कामासाठी निधी उपलब्ध होण्याबाबतची मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. त्यामुळेच उपसा सिंचन योजनांची क्षेत्रीय प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) शिंदोडी, मांडवे, बिरेवाडी, खरशिंदे, साकुर, वरवंडी, पेमगिरी, शिरापूर, डिग्रस, पारेगाव खु. व बु., तिगाव, काकडवाडी, करुले, क-हे, निमोन, व सोनोशी या 17 गावातील अवर्षण प्रवण क्षेत्राचा समावेश आहे.

या भागात उपसा सिंचन झाल्यास पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 251 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या 1800 हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी 96 लाख 98 हजार 141 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या 2100 हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठी 1 कोटी 40 लाख 33 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सर्वेक्षणानंतर प्रामुख्याने नलिका प्रणालीचे सखोल संकल्पन केल्यानंतर अहवाल सादर करण्यात येईल. याशिवाय नदीपात्र, नदीकाठ ते जॅक वेल तसेच संपूर्ण नलिका वितरणाचे तलांक नकाशावर दर्शविण्यात येतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com