मुकुंदनगरला 70 हजारांचे गोमांस पकडले

तिघांविरूध्द गुन्हा; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
मुकुंदनगरला 70 हजारांचे गोमांस पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुकुंदनगर भागात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्याची विक्री करणार्‍या तिघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले. रमीज राजमोहम्मद शेख (वय 22 रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर), वसीम मोहम्मद कुरेशी (वय 26 रा. सदर बाजार, भिंगार) व जाकीर गुलामनबी कुरेशी (वय 38 रा. हमालवाडा, नालबंद खुंट) अशी पकडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुंदनगर भागात इनाम मस्जिदजवळ हिना पार्क येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्याची विक्री करत असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांंना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विलास गारूडकर, दिलीप झरेकर, अजय नगरे, आर.आर.द्वारके, गणेश साठे, राहुल गोरे, भानुदास खेडकर, सचिन धोंडे, भागचंद लगड, संजय काळे यांनी नमूद ठिकाणी छापा टाकला असता त्यांना तिघे जण गोमांस विक्री करताना आढळून आले. 335 किलो गोमांस व इतर साहित्य असा 70 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास अंमलदार खेडकर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com