मुकुंदनगरमधील डॉक्टरसह तिघांना मारहाण

मुकुंदनगरमधील डॉक्टरसह तिघांना मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सात ते आठ महिन्यांपूर्वी मुकुंदनगर येथील डॉक्टरच्या मुलाला बळजबरीने दुचाकीवर बसवून पळून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांनी शनिवारी दुपारी डॉक्टर, त्यांचा मुलगा व भाच्याला मारहाण करून जखमी केले आहे. डॉ. सय्यद उम्रान हमिद (वय- 41), त्यांचा मुलगा सय्यद अब्दुल कादीर उम्रान व भाचा शेख सैफ आश्पाक (रा. मुकुंदनगर) अशी जखमींचे नावे आहेत.

सय्यद अब्दुल कादीर उम्रान याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डॉ. सय्यद यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे मोसिन मुसा शेख, तौफिक मुसा शेख, आर्यन शाकीर शेख, मोईन मोहसीन शेख (रा. मुकुंदनगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, सात ते आठ महिन्यांपूर्वी फिर्यादी यांच्या मुलास आरोपी यांनी बळजबरीने दुचाकीवर बसवून पळून नेण्याचा प्रयत्न केला होता. ते सर्वजण फिर्यादी यांच्या मुलाला शनिवारी दुपारी दिसल्याने त्याने फिर्यादीस याबाबत कल्पना दिली. तेव्हा फिर्यादी हे त्याच्या मुलगा व भाचा यांना घेऊन मुकुंदनगर येथील आयशा मज्जीदजवळ आरोपीकडे गेले होते.

तेव्हा तेथे असलेल्या मुलांना फिर्यादी म्हणाले, तुम्ही माझ्या मुलाला दुचाकीवर का बसविले होते. तेव्हा ते फिर्यादीला म्हणाले, तुम्ही आमच्या वडिलांसोबत बोला. तेवढ्यात त्यांचे वडिल त्याठिकाणी आले व त्यांनी फिर्यादी, त्यांचा मुलगा व भाच्याला मारहाण केली. तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले, तुमच्या मुलांनी माझ्या मुलाला उचलण्याचा प्रयत्न केल्याचा पुरावा आहे.

तेव्हा फिर्यादी आरोपींना घेऊन इनामी मज्जीदजवळ सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी गेले. तेथे फिर्यादीच्या मुलास मोसिम शेख याने दगडाने मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच इतर आरोपींनी डॉक्टर व त्यांच्या भाच्याला मारहाण केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार गोल्हार करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com