अनंत अंबानी साईंच्या चरणी... ‘इतक्या’ कोटी रुपयांची देणगी अर्पण

अनंत अंबानी साईंच्या चरणी... ‘इतक्या’ कोटी रुपयांची देणगी अर्पण

शिर्डी | प्रतिनिधी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर शिर्डीत हजेरी लावली. त्यांनी साईंच्या चरणी १ कोटी ५१ लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणगीचा चेक सुपूर्द केला. याबाबत मंदिर समितीच्या वतीने अंबानी यांचे आभारही मानण्यात आले.

अनंत अंबानी यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचे स्वागत केले. अंबानी यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

याआगोदार महिनाभरात दोनवेळा त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला होता. आज दीपावली निमित्ताने साई चरणी नतमस्तक होत अनंत अंबानी यांनी साईचरणी 1 कोटी 51 लाखांचा धनादेश अर्पण केला. शिर्डीमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर साई बाबांचे अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात. देशभरातील भाविक शिर्डीत दिवाळीला दर्शनासाठी येत असल्यानं मोठी गर्दीही होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com