
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शनिवारी नगर शहरात निघालेल्या मोहरम सवारी विसर्जन मिरवणूकीदरम्यान डीजे वाजवून सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपक आवाजा-संबंधी ठरवून दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अंमलदार मच्छिंद्र पांढरकर यांनी फिर्याद दिली आहे.
जामा मस्जिद यंग पार्टीचे अध्यक्ष आवेश निसार शेख (रा. जामा मस्जिदजवळ, जुने कोर्ट गल्ली), दोन अनोळखी व डीजे मालक महेश अशोक जावळे (रा. जावळे मळा, शेंडी, ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजे न वाजविता सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपक आवाजासंबंधी ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे अटी व शर्तीचे पालन करण्यासंदर्भात कोतवाली पोलिसांनी शेख व इतरांना सीआरपीसी कलम 149 नुसार नोटीसची बजावणी केली होती. तरीही शेख व इतरांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवून आदेशाचा भंग केल्याने कोतवाली पोलिसांनी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.