नगर शहरात मोहरम विसर्जन शांततेत

नगर शहरात मोहरम विसर्जन शांततेत

पोलिसांचा मोठा बंदोबस्त : या हुसेन... या हुसेनच्या घोषणा

अहमदनगर | प्रतिनिधी

नगरची (Ahmednagar) ऐतिहासिक मोहरम (Muharram) विसर्जन यावर्षी देखील साध्या पद्धतीने पार पडली. निवडक मुस्लिम बांधवांना सवारी उचलण्याची परवानगी देण्यात आली होती. कोठला परिसराच्या आवारातच ‘या हुसेन... या हुसेन...’ म्हणत मिरवणूक काढण्यात आली.

नगर शहरात मोहरम विसर्जन शांततेत
ध्येयवेड्या प्रणाली चिकटेचा १० हजार किमीचा थक्क करणारा प्रवास...

कोविडच्या (COVID19) पार्श्वभूमीमुळे यावर्षी देखील मोहरम (Muharram 2021) कसा साजरा होणार याकडे लक्ष लागले होते. शहर पोलीस (Ahmednagar Police) प्रशासनाचाही कस लागला होता. गुरूवारी कत्तलच्या रात्रीनंतर शुक्रवारी मुख्य मोहरम विसर्जनाकडे लक्ष लागले होते. पोलिसांनी केलेले नियोजन आणि कोठला ट्रस्टची मदत पूरक यासाठी ठरली आणि मोहरम विसर्जन शांततेत झाले. कोविडमुळे दोन वर्षांपासून सण-उत्सव सार्वजनिक स्तरावर साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. नगर येथील मोहरम उत्सव देशात प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता.

करोनाच्या दुसर्‍या लाटेचे (Corona Second Wave) निर्बंध सध्या लागू आहेत. मोहरमसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूची जाहीर केली होती. त्यानुसारच मोहरम साजरा करण्याचे शहर पोलिसांचे नियोजन होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली व तोफखाना पोलिसांनी अहमदनगर शहरातील यंग पार्ट्यांशी संवाद साधला. कोठला येथील ट्रस्टी देखील पोलीस प्रशासनाला नियोजनासाठी मदत केली. कत्तलच्या रात्री कोठला येथील छोटे इमाम यांची सवारी मोजक्याच मुस्लिम बांधवांना उचलण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार छोटे इमाम यांची सवारी कोठला येथे फिरविण्यात आली. मुख्य मोहरमच्या मिरवणुकीला असेच नियोजन करण्यात आले. बडे इमाम यांची सवारी उचलण्याचा मान पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके तसेच निसार जहागिरदार यांना देण्यात आला.

बडे आणि छोटे इमाम यांच्या सवारी उठल्यानंतर मुस्लिम बांधवांनी कोठला परिसरात एकच जल्लोष केला. या हुसेन... या हुसेन... घोषणांनी कोठला परिसर दणाणला होता. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, अजित पाटील, प्रांजल सोनवणे, निरीक्षक ज्योती गडकरी, निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चारशे पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त होता. कोठला परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते. रात्री उशिरपर्यंत कोठला परिसराला पोलिसांची गस्त सुरूच राहील, अशी माहिती निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com