चिखलात रूतला रस्ता

तपोवन रोडवरील दक्षता नगरवासी आक्रमक
चिखलात रूतला रस्ता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील (Savedi) अनेक उपनगरातील रस्ते सध्या चिखलात (Mud) रूतल्याने नागरिक हैराण झाले आहेत. किती दिवस चिखल (Mud) तुडवणार, असा सवाल करत तपोवन रोडवरील (Tapovan Road) दक्षता नगरवासी आक्रमक (Aggressive) झाले आहेत. आठ दिवसात रस्त्यांवर मुरूम टाकून रस्ता रहदारीसाठी उपलब्ध करून द्यावा, महिनाभरात रस्ता विकास निधी (Fund) उपलब्ध करून दयावा, अन्यथा तीव्र आंदोलन (Movement) करण्यात येईल असा इशारा (Hint) महापालिकेला (Municipal Corporation) देण्यात आला. दरम्यान, तातडीने रस्ता दुरूस्तीचे काम होईल, असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

प्रभाग क्र. 1 हा सावेडी उपनगर परिसराचा भाग असून हा परिसर नव्याने विकसित होत आहे. मूलभूत प्रश्नांपासून विकास कामे करावी लागत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढत आहेत. सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून प्रभागातील काही भागात रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. नागरिकांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. शाळेतील मुलांना ने-आन करण्यासाठी स्कूलबस येत नाहीत.

गॅस टाकीची गाडी नागरिकांच्या दारापर्यंत येत नाही. सध्या नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तरी येत्या आठ दिवसात तपोवन रोड परिसरातील दक्षता नगर मधील रस्त्यांवर मुरूम टाकावा. एक महिन्यात रस्त्याच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दयावा, अन्यथा नागरिकांसमवेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर व नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

येत्या दोन दिवसात खराब रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकला जाईल, कोणत्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता मनपा प्रशासन घेईल तसेच पाऊस उघडल्यानंतर मंजूर रस्त्यांची डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची कामे सुरू होतील, असे आश्वासन आयुक्त शंकर गोरे यांनी शिष्टमंडळात दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com