म्युकरमायकोसिस रुग्णांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

उपचारासाठी लागतात 18 ते 20 लाख रुपये; उपचाराचा खर्च नाकापेक्षा मोती जड
म्युकरमायकोसिस रुग्णांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी
म्युकरमायकोसिस

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

म्युकरमायकोसिस (Mucormycosis) झालेल्या रुग्णांना (Patient) दोन ते तीन महिन्यापर्यंत गोळ्या चालू ठेवाव्या लागतात. दवाखान्याचा (Hospital) व या तीन महिन्यांपर्यंत येणारा खर्च सुमारे 18 ते 20 लाखांपर्यंत जातो. या उपचारासाठी लागणारा खर्च नाकापेक्षा मोती जड असा आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस (Mucormycosis) झालेल्या रुग्णांना राज्य शासनाने अर्थिक मदत करावी (state government should provide financial assistance), अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

जागतिक महामारी करोना( Corona pandemic ) या रोगाची भारतात झपाट्याने वाढ झाली. महाराष्ट्रात सुद्धा करोनाचा प्रसार शहराबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाला. महाराष्ट्र सरकारने करोना रोगाच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात कोविड सेंटरची (Covid Center) उभारणी केली. तसेच नगरपालिका, महानगरपालिका, सामाजिक संस्था, लोकवर्गणी, खाजगी दवाखाने यांच्या माध्यमातून अनेक कोविंड सेंटरची उभारणी करून यशस्वी उपचार (Treatment) केले. यात काहींचा उपचारादरम्यान मुत्यु झाला.

करोना हा रोग बरा झाल्यानंतर रुग्णाचा पिछा सुटला नाही. करोना झालेल्या रुग्णांना अतिशय घातक अशा म्युकरमायकोसिस (Mucormycosis) रोगाने ग्रासले. याचा परिणाम रुग्णाच्या शरीरावर झाला. यात रुग्णाचे डोळे काढावे लागले. त्याचबरोबर मेंदू, नाक, कान, किडन्या अशा अनेक मानवी शरीरावर त्याचा परिणाम झाला. यात उपचारा दरम्यान मुत्यू सुद्धा झाला. बर्‍याच रुग्णांना आपल्या शरिराचा भाग गमवावा लागला. विकलांगपणाचे प्रमाण वाढले. हे सर्व उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजने (Mahatma Phule Janaarogya Yojana) अंतर्गत दीड लाखांपर्यंतच होतात.

प्रत्यक्षात रुग्ण बरा होईपर्यत 18 ते 20 लाखांपर्यंत खर्च (Expenses) येतो. हा खर्च बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना (Patient) दोन ते तीन महिन्यापर्यंत गोळ्या चालू ठेवाव्या लागतात. हा तीन महिन्यापर्यंत खर्च 1 ते 2 लाखांपर्यंत येतो. या उपचारासाठी लागणारा खर्च नाकापेक्षा मोती जड असा आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना राज्य शासनाने अर्थिक मदत करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

राहाता तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथील जिरायती भागातील गरीब शेतकरी प्रेमराज निर्मळ यांना करोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या रोगाची लागण झाली. यात त्याना आपला एक डोळा गमवावा लागला. त्यांना उपचारासाठी वीस लाख रुपये खर्च आला. या गरीब शेतकर्‍याला गावाने, नातेवाईक, मित्रांनी तसेच कुटुंबातील स्त्रियांचे सोने मोडून, शेळ्या, गायी विकून, उसनवारी करून उपचार केले. रुग्ण घरी आणला असला तरी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना 2 ते 3 महिन्यांपर्यंत गोळ्या चालू ठेवाव्या लागणार आहेत. हा खर्च 2 लाखांपर्यंत आहे. त्यामुळे या कुटुंबियाच्यावतीने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील तमाम म्युकरमायकोसिस रुग्णांना आर्थिक मदतीसाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील, देवेंद्र फडणविस, प्रविण दरेकर यांनी मागणी करावी, असा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com