म्युकोरमायकोसिसचे जिल्ह्यात 180 रुग्ण

म्युकोरमायकोसिसचे जिल्ह्यात 180 रुग्ण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसच्या आतापर्यंत 180 रूग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली. म्युकोरमायकॉसिसचे लक्षण आढळताच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

जिल्ह्यात करोना पाठोपाठ म्युकोरमायकॉसिस आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. करोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकोरमायकोसिस आजाराची लक्षणे ही आता मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेली आहे. वाढत्या रुग्णांमुळे त्यावरील औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा रुग्णालयासह नगर शहरातील खाजगी रुग्णालय व जिल्ह्यातील काही ठरावीक रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

म्युकोरमायकोसिसवर दोन इंजेक्शन प्रभावी ठरले आहे. परंतु, जिल्ह्यासाठी त्यांचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. यासाठी लागणार्‍या औषधांसाठी जिल्हा प्रशासन शासनाकडे प्रयत्न करत आहे. दरम्यान सुरूवातीला जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसचे रूग्ण कमी होते. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये यात वाढ होवून ते 180 झाले आहे. यातील चार जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे.

आतापर्यंत 4 बळी

म्युकरमायकोसिसने जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने पहिला बळी कर्जतमधील मिरजगावात गेला. त्यानंतर नगरमधील बोल्हेगावातील रुग्ण दगावला. श्रीरामपुरातील इंजिनिअर तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला. तर काल सोनईतील एक रुग्ण दगावला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com