
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यात महाविरण कंपनीने अनधिकृत ग्राहकांना वेळोवेळी सांगूनही ग्राहक अधिकृत कनेक्शन घेत नाहीत किंवा अधिकृत कनेक्शन असले तरी वीजचोरी काही थांबत नाही.त्यामुळे तालुक्यातील संवत्सर कक्षाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे यांनी करंजी, नऊचारी, पढेगाव परिसरात वीज चोरी रोखण्यासाठी मोहीम राबवली.
या मोहिमेत एकूण 20 ग्राहक सापडले असून त्यात कृषीपंपाच्या कनेक्शनवर घरगुती वीज वापर करणे, अधिकृत कनेक्शन असूनही वीज चोरून वापरणे, वीज चोरी करणार्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून जे शेती व घरगुती ग्राहक अनधिकृतपणे विजेचा वापर करतात अशा ग्राहकांनी आपले वीज कनेक्शन अधिकृत करून घ्यावे तसेच कोणीही सिंगल फेज शेती पंप मोटर, हिटर, शेगडी, कुट्टी मशीन आदी उपकरणांचा वापर करू नये अन्यथा येणार्या काळात अशा अनधिकृत वीज वापरणार्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे वीज वितरण कंपनी संवत्सर कक्षाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे यांनी सांगितले.