महावितरणाच्या गलथान कारभारामुळे वीजेच्या धक्क्याने यूवकाचा मृत्यू

वडील आणि भाऊ गंभीर जखमी
महावितरणाच्या गलथान कारभारामुळे वीजेच्या धक्क्याने यूवकाचा मृत्यू

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

पहाटे उठून शौचासाठी घराबाहेर जात असताना बाहेर पडलेली विजेची तारा पाहण्यात न आल्याने युवकाचा तारेला पाय चिटकला. यावेळी त्याला जोरदार वीजेचा धक्का (Electric shock) बसला. त्या युवकाच्या (Youth) ओरडण्याने वडील व भाऊ यांनी वीजेचा धक्का बसलेल्या युवकाला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोघांनाही जोरदार वीजेचा धक्का बसून ते जखमी (Injured) झाले. यात संबंधीत युवक मृत्यू (Youth Death) झाला असून त्याचे वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहे.

ही घटना जामखेड (Jamkhed) तालुक्यातील वंजारवाडी (Vanjarwadi) येथे घडली आहे. याबाबत जामखेड (Jamkhed) पोलीसात (Police) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश बळीराम जायभाय (वय 23) हा पहाटेच्या सुमारास उठून शौचा करण्यासाठी जात असतांना घरा जवळील विद्युत खांबावरील तार तुटून खाली पडली होती. ती त्यास दिसली नसल्याने त्याचा तारेवर पाय पडल्याने त्याला वीज प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. त्याच्या आरडाओरडमुळे वडील बळीराम जायभाय व भाऊ गोकुळ धावत आले आणि त्यांनी यांना त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना वीजेचा जोरदार बसला व ते ही खाली पडले.

वडील बळीराम हे बेशुद्ध पडले तर भाऊ गोकुळ याचा हात भाजला. त्यावेळी शेजारील राहणारे नातेवाईक यांनी दोरीच्या साह्याने तार बाजुला करून योगेश याला बाजूला करून जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित केले. योगेशच्या अपघाती निधनाने वंजारवाडी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com