5 हजार कृषीग्राहकांकडे 191 कोटी थकबाकी

नगर जिल्ह्यातील स्थिती || बड्या कृषिग्राहकांवर महावितरण उगारणार कारवाईचा बडगा
5 हजार कृषीग्राहकांकडे 191 कोटी थकबाकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वारंवार थकीत देयकाची रक्कम भरण्यासाठी आवाहन करून, तसेच ही रक्कम भरण्यासाठी विविध योजना आखूनही महावितरणच्या आवाहनास अजिबात प्रतिसाद न देणार्‍या पाच वर्षाहून अधिक काळापासून देयक थकवणार्‍या आणि ज्या कृषी ग्राहकांचा मंजूर जोडभार 7.5 अश्वशक्ती पेक्षा अधिक आहे, अशा कृषी ग्राहकांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम कोकण प्रादेशिक विभागासह नगर मंडळात सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती महावितरणचे कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील 5 हजार 156 शेतकर्‍यांनी 191 कोटी 92 लाख रुपये थकवले आहे. महावितरणकडून आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने या शेतकर्‍यांच्या विरोधात महावितरण प्रशासनास नाईलाजाने कारवाई करावी लागणार आहे. नगर जिल्ह्यात 5 ते 10 वर्षात शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या 2 हजार 959 असून या ग्राहकांकडे 102 कोटी 35 लाख रुपये थकबाकी आहे.

त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या पुढीलप्रमाणे 7.5 ते 10 अश्वशक्ती असणारे 2 हजार 185 ग्राहक, 10 ते 20 अश्वशक्ती असणारे 686 आणि 20 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍याची संख्या 88 आहे. 10 ते 15 वर्षात शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या 1 हजार 594 असून, या ग्राहकांकडे 63 कोटी 19 लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या पुढीलप्रमाणे 7.5 ते 10 अश्वशक्ती असणारे 1 हजार 244 ग्राहक, 10 ते 20 अश्वशक्ती असणारे 327 आणि 20 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍याची संख्या 23 आहे.

15 वर्षापेक्षा जास्त कालावधीत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या 603 असून, या ग्राहकांकडे 26 कोटी 36 लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या पुढीलप्रमाणे 7.5 ते 10 अश्वशक्ती असणारे 482 ग्राहक, 10 ते 20 अश्वशक्ती असणारे 110 आणि 20 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍याची संख्या 11 आहे.

अशी एकूण जिल्ह्यात 5 ते 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या 5 हजार 156 असून या ग्राहकांकडे 191 कोटी 92 लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या पुढीलप्रमाणे 7.5 ते 10 अश्वशक्ती असणारे 3 हजार 911 ग्राहक, 10 ते 20 अश्वशक्ती असणारे 1 हजार 123 आणि 20 अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍याची संख्या 122 आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com