वीज कर्मचाऱ्यांचा संपाने पोलीस खातेही टेन्शनमध्ये, कारण...

वीज कर्मचाऱ्यांचा संपाने पोलीस खातेही टेन्शनमध्ये, कारण...

लोणी | वार्ताहर

राज्यभरातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवार मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. याचा मोठा परिणाम राज्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पोलीस खातेही टेन्शनमध्ये आले आहे.

राहाता तालुक्यातील गोगलगाव रात्री बारा वाजेपासून अंधारात आहे. या अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या, घरफोडयांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने पोलीस खातेही टेन्शनमध्ये आले आहे.

वीज कर्मचाऱ्यांचा संपाने पोलीस खातेही टेन्शनमध्ये, कारण...
राज्यातील वीज कर्मचारी संपावर; अनेक भागात बत्ती गूल, नागरिकांना फटका

अनेकांना या संपाची कल्पनाही नसल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. रब्बीच्या नवीन लागवड झालेल्या पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पिठाच्या गिरणी बंद झाल्याने शेजाऱ्यांकडे पीठ मागण्याची वेळ काहींवर आली आहे.

वीज कर्मचाऱ्यांचा संपाने पोलीस खातेही टेन्शनमध्ये, कारण...
धक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापली

अनेकांचे मोबाईल चार्ज होऊ न शकल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. आजारी व्यक्तींनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. कुणाला फोन करायचा असा प्रश्न लोकांना पडला आहे. अशी परिस्थिती राहिली तर तीन दिवसात मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो. पहिल्याच दिवशी नागरिक संतप्त झाल्याचे चित्र आहे.

वीज कर्मचाऱ्यांचा संपाने पोलीस खातेही टेन्शनमध्ये, कारण...
Air India च्या विमानात प्रवाशाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अंगावर केलं मूत्रविसर्जन

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com