भेंडा l वार्ताहर l Bhenda

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.वैशाली शिवाजी शिंदे तर उपसरपंचपदी दादासाहेब हौशीराम गजरे यांची निवड झाली आहे.

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या 17 जागांपैकी एकत्रित पॅनल असलेल्या श्री संत नागेबाबा ग्रामविकास पॅनलचे 13 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या तर 4 जागांसाठी निवडणूक झाली होती. गावात एकोपा रहावा व विकास व्हावा यासाठी नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांचे पुढाकारातून गावातील सर्व राजकिय गट व पुढारी यांनी एकत्र येऊन निवडणूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच 13 जागा बिनविरोध तर 3 जागा निवडणूकीतून असा 16 जागा एकत्रित श्रीसंत नागेबाबा ग्रामविकास पॅनलला मिळाल्या होत्या तर एक अपक्ष निवडून आला होता. परंतु सरपंच पदावरून ही एकी फिस्कटन्याचं बेतात होती. तुकाराम मिसाळ, डॉ.शिवाजी शिंदे व अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे असे सरळ सरळ दोन गट पडले होते. मात्र माजी आमदार पांडुरंग अभंग व कडूभाऊ काळे यांनी सर्वांनी एकत्रच रहावे यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्याला यश मिळून एकोपा राखण्यात यश मिळाल्याने ही निवडणूक अखेर बिनविरोध झाली.

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण व्यक्ती साठी आरक्षित आहे. सरपंच पदासाठी सौ.वैशाली शिवाजी शिंदे, सौ.उषा लहानू मिसाळ, सौ.सुहासिनी किशोर मिसाळ असे तीन तर उपसरपंच पदासाठी दादासाहेब हौशीराम गजरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सौ.उषा मिसाळ व सौ.सुहासिनी मिसाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सरपंचपदी सौ.वैशाली शिंदे यांची तर उपसरपंचपदी दादासाहेब हौशीराम गजरे यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय गोरक्षनाथ मिसाळ, उषा लहानू मिसाळ, स्वाती अशोक वायकर, दिलीप भास्कर गोर्डे, माया दत्तू गंगावणे, सुहासिनी किशोर मिसाळ, संगीता गणेश गव्हाणे, संगीता नामदेव गव्हाणे, पंढरीनाथ रामराव फुलारी, रोहिणी नामदेव निकम, अण्णासाहेब विठ्ठल गव्हाणे,कादर अब्दुल सय्यद, मंगल अरुण गोर्डे, स्मिता देवेंद्र काळे, लताबाई यडू सोनवणे उपस्थित होते.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तुकाराम मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे, पत्रकार सुखदेव फुलारी, नामदेव निकम, नामदेव शिंदे, अशोकराव गव्हाणे, देविदास गव्हाणे, अशोक वायकर, गुलाबराव आढागळे, अंबादास गोंडे, यडूभाऊ सोनवणे, राजेंद्र चिंधे, बाळासाहेब गजरे आदींनी प्रयत्न केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुळा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता डी.एन.शिवगण तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी रेवनाथ भिसे यांनी काम पाहिले. नव नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच यांचे राज्याचे जकसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी अभिनंदन केले.