सोनेवाडी l वार्ताहर l Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी

कोल्हे गटाच्या सौ.सुवर्णा सतीश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचदाच्या निवडणूकीत कोल्हे गटाचे जालिंदर रावसाहेब चव्हाण हे विजयी झाले.

जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोल्हे गटाच्या बिनविरोध निवडून आलेल्या सौ पवार यांची सरपंच निवडणूकीत बिनविरोध निवड झाली. मात्र उपसरपंचदाच्या निवडणूकीत काळे गटाकडून किशोर मनोहर वक्ते यांनी तर कोल्हे गटाकडून जालिंदर रावसाहेब चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अधिकारी कोपरगाव नगरपरिषदेचे विद्युत अभियंता रोहीत सोनवणे यांनी उपसरपंचदासाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेतली. त्यांना ग्रामसेवक कैलास रणछोड व लिपिक आनंद बारशे यांनी मदत केली. जालिंदर चव्हाण यांनी किशोर वक्ते यांचा पराभव करत उपसरपंचदाची निवडणुकीत जिंकली.