अहमदनगर -

एमपीएससी ची तयारी करणार्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील वैभव शितोळे या विद्यार्थ्याचं पुण्यात करोनाने निधन झाले

आहे. वैभव 2014 साली पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी आला होता. त्याने याआधी अनेक परीक्षा देखील दिल्या होत्या. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता.

आंदोलनानंतर तीन दिवसांनी त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळे त्याला परीक्षा देखील देता आली नव्हती. रुग्णालयात त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती.

परंतु शुक्रवारी प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला.नाशिक येथे इंजिनिअरींग चे शिक्षण पूर्ण केलेल्या वैभवला एक बहीण आहे, तिचं नुकताच लग्न झालं. तर आई-वडिल शेती करतात. आई-वडिलांसाठी तो एकुलता एक होता. वैभवला पोलीस सेवेत जायचं होतं. डीवायएसपी होण्याचे त्याचे स्वप्न होते.