राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेला अडीच हजारांहून अधिकांची दांडी

परीक्षा सुरळीत || मोठा बंदोबस्त
राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेला अडीच हजारांहून अधिकांची दांडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यसेवा (पूर्व) परीक्षा रविवारी नगरमधील 24 केंद्रावर दोन सत्रात सुरळीत पारपडली. पहिल्या सत्रात झालेल्या पेपरला 2 हजार 503 तर दुसर्‍या सत्रात झालेल्या पेपरला 2 हजार 538 उमेदवार गैरहजर होते, अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

नगरमध्ये झालेल्या या पूर्व परीक्षेला दोन सत्रासाठी 8 हजार 594 उमेदवारांनी नोंदणी केलेली होती. परीक्षा सुरळीत पारपाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी 6, भरारी पथक प्रमुख-1, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख 24 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील एकूण 902 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होते.

परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रथम सत्रासाठी सकाळी 8.30 वाजता व दुसर्‍या सत्रासाठी दुपारी 1.30 वाजता प्रवेश देण्यात आला. परीक्षेसाठी उमेदवारांना काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. यावेळी उमेदवारांनी एकमेकांचे पेन, लिखान साहित्य आदी वापरण्यास मनाई करण्यात आली होती. पहिल्या सत्रातील पेपरसाठी 6 हजार 91 उमेदवार हजर होते, तर 2 हजार 503 गैरहजर होते, तर दुसर्‍या सत्रात झालेल्या पेपरला 6 हजार 56 उमदेवार हजर होते, तर 2 हजार 538 उमेदवार गैरहजर होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com