राज्यसेवा पूर्व परीक्षेला साडे चार हजार उमेदवारांची दांडी

राज्यसेवा पूर्व परीक्षेला साडे चार हजार उमेदवारांची दांडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (State Service Pre-Examination) रविवारी (दि.23) नगर शहरातील 34 केंद्रावर दोन सत्रात पारपडली. या परिक्षेला (Exam) 12 हजार 452 उमेदवारांपैकी जवळपास साडेचार हजार उमेदवारांनी दांडी मारली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगावतीने (MPSC) घेण्यात आलेली ही परीक्षा शांतते पारपडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. नगर शहरातरील 34 केंद्रावर (Nagar city Center) ही परीक्षा झाली. परीक्षेच्या सकाळच्या सत्रात 12 हजार 452 पैकी 7 हजार 916 उमेदवार हजर होते. तर दुपारच्या सत्रात 12 हजार 452 पैकी 7 हजार 899 विद्यार्थी हजर होते. पहिल्या सत्रात 4 हजार 536 आणि दुसर्‍या सत्रात 4 हजार 553 उमदेवार गैरहजर होते.

यामुळे दोन सत्राला सरासरी प्रत्येकी सोड चार हजार उमदेवारांनी दांडी मारली (Candidate Absent from Exam) असल्याची जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटरपर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक बंद ठेवण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com