MPSC परीक्षेत नगरचा महेश हरिश्चंद्रे ओबीसी विभागात राज्यात दुसरा

MPSC परीक्षेत नगरचा महेश हरिश्चंद्रे 
ओबीसी विभागात राज्यात दुसरा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 अंतिम निकालाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अहमदनगरचा महेश शिवाजी हरिश्चंद्रे राज्यात 9 वा तर ओबीसी विभागात दुसरा आला आहे.

पाटबंधारे विभागातील कर्मचारी शिवाजी हरिश्चंद्रे यांचा तो मुलगा आहे. महेश ने विळद घाट येथील विखे पाटील महाविद्यालयात बीए मेकॅनिकल इंजिनिअरीगचे शिक्षण पूर्ण करुन स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. राज्यसेवा मुख्य परीक्षेत त्याने उत्तम यश संपादन केले.

Related Stories

No stories found.