एमपीएससी परीक्षेला 3 हजार 876 परीक्षार्थींची दांडी

एमपीएससी परीक्षेला 3 हजार 876 परीक्षार्थींची दांडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा शनिवार, 8 रोजी 50 उपकेंद्रांवर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत पार पडली. या परीक्षेला 16 हजार 81 पैकी 3 हजार 876 उमेदवार गैरहजर होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा केंद्रप्रमुख पल्लवी निर्मळ यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेसाठी वयोमर्यादेत वाढ केली आहे. शहरातील 50 उपकेंद्रांवर एकूण 16 हजार 81 उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. उपजिल्हाधिकारी संवर्गातील 13 समन्वय अधिकारी, दोन भरारी पथकप्रमुख, वर्ग-एक संवर्गातील 50 उपकेंद्रप्रमुख अधिकारी, पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस या वर्ग-तीन संवर्गातील एकूण एक हजार 425 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. या परीक्षेला 3 हजार 876 उमेदवार गैरहजर होते. 12 हजार 205 उमेदवार उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वाहतुकीची कोंडी

या परीक्षेसाठी अनेक उमेदवार चारचाकी वाहनांतून आले होते. परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात ही वाहने उभी केली होती. परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांनी घरी जाण्यासाठी एकाच वेळी रस्ता धरला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. सुमारे एक-दीड तासाने वाहतूक सुरळीत झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com