शनिवारी 18 उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा

सहा हजार 652 परीक्षार्थी; 649 अधिकारी- कर्मचार्‍यांची नियुक्ती
शनिवारी 18 उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील 18 उपकेंद्रांवर सकाळी 11 ते दुपारी 12 यावेळेत घेण्यात येणार आहे. अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली आहे.

या परीक्षेसाठी नगर शहरातील 18 उपकेंद्रांवर एकूण सहा हजार 652 उमेदवार परीक्षेस बसलेले आहेत. या उपकेंद्रावर (शाळा/महाविदयालय) उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या परीक्षेकामी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी 5, भरारी पथक प्रमुख 1, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख 18 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील एकूण 625 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी 9.30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 1973 चे कलम 144 (3) लागू करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com