एमपीएससीच्या मुख्य सचिवपदी राहुरीच्या स्वाती म्हसेंची नियुक्ती

स्वाती म्हसे
स्वाती म्हसे

राहुरी | Rahuri

एसईबीसी अंतर्गत नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची याचिका राज्य सरकारला अंधारात ठेऊन केल्या प्रकरणात

एमपीएससीचे मुख्य सचिव प्रदीपकुमार यांना हलविण्यात आले असून त्यांच्या जागी स्वाती म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे म्हसे या राहुरी तालुक्यातील मेंढवणच्या आहेत. नगर जिल्ह्याला दुसर्‍यांदा मान मिळाला आहे. यापूर्वी संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील जर्‍हाड यांना मुख्यमंत्र्यांचे सचिव पदाचा मान मिळालेला आहे.

भाजपाचे नेते साहेबराव म्हसे यांच्या त्या वहिनी आहेत. स्वाती म्हसे यांची ही नियुक्ती राहुरी तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे ज्येष्ठ नेते उत्तमराव म्हसे, सरपंच साहेबराव म्हसे, उपसरपंच दिलीपराव म्हसे, संभाजी पेरणे, शिवाजी औटी, सुनील हिवाळे यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com