खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा भेंड्यात राष्ट्रवादीकडून निषेध

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा भेंड्यात राष्ट्रवादीकडून निषेध

भेंडा |वार्ताहर| Bhenda

संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने भेंडा बुद्रुक येथे निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले, राज्यात अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत असताना सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार अशाप्रकारे महिलांबाबत, खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल आक्षेपार्ह विधाने करतात त्यांचा आम्ही निषेध करतो. तसेच मंत्री सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली.

यावेळी नेवासा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष काशिनाथ नवले, गफूर बागवान, सरचिटणीस गणेशराव गव्हाणे, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष संगीताताई गव्हाणे, सरपंच प्रा. उषाताई मिसाळ, शंकर भारस्कर, सागर महापूर यांनीही आपल्या भाषणातून मंत्री सत्तार यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी तुकाराम मिसाळ, ज्ञानेश्वरचे संचालक शिवाजी कोलते, अशोकराव मिसाळ, जनार्दन कदम, डॉ. लहानु मिसाळ, उपसरपंच मंगल गोर्डे, दत्तात्रय खाटिक, भीमराज शेंडे, भेंडा सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे, उपाध्यक्ष संदीप फुलारी, सम्मद शेख, ज्ञानेश्वर आरगडे, वैभव नवले, बापूसाहेब नवले, बंडू वेताळ, हरिभाऊ नवले, अण्णासाहेब महापूर, वामनराव मापारी, बलभिम फुलारी, गुलाबराव अढागळे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांना निवेदन देण्यात आले. कॉन्स्टेबल नितीन भताने, कॉन्स्टेबल आपासाहेब तांबे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com