अदृश्य शक्तीने महाराष्ट्रात फिरावे

सुप्रिया सुळेंनी दिले अमित शहांना आव्हान
अदृश्य शक्तीने महाराष्ट्रात फिरावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशात एएस म्हणजे अदृश्य शक्ती कार्यरत आहे, असे खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणताच महाविकास आघाडी पदाधिकार्‍यांनी अमित शहांच्या नावाचा गलका केला...त्यावर, मी कोणाचे नाव घेत नाही, पण तुम्ही म्हणताय असे स्पष्ट करीत, या अदृश्य शक्तीने एकट्याने महाराष्ट्रात फिरावे, म्हणजे त्यांना खरा महाराष्ट्र समजेल व लोकांच्या भावनाही कळतील, असे आव्हान खा. सुळे यांनी सोमवारी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांचे थेट नाव न घेता दिले.

अदृश्य शक्तीने महाराष्ट्रात फिरावे
श्रीरामपुरातील वाळूतस्कर दाभाडे, श्रीगोंद्यातील बंटी कोथींबीरे नाशिक कारागृहात ‘स्थानबध्द’

पाथर्डीच्या (Pathardi) दौर्‍यानिमित्त खा. सुळे नगरला आल्या होत्या. येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी नगर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

अदृश्य शक्तीने महाराष्ट्रात फिरावे
तलाठी भरती परीक्षा : 15 डिसेंबरपर्यंत गुणवत्ता यादी

यावेळी खा. सुळे यांनी जिल्ह्यातील सद्य राजकीय स्थितीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी स्थानिक स्तरावरही एकत्रित राहावे, आपल्याला वातावरण अनुकूल आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या (Loksabha) दोन व विधानसभेच्या सर्व 12 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या, तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच नगरला मेळावा घेतला जाणार आहे. यासाठी अनिल देसाई, संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांच्याशी मी बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अदृश्य शक्तीने महाराष्ट्रात फिरावे
आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com