खासदार विखे रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत म्हणाले...

खासदार विखे रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत म्हणाले...

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राहाता तालुक्यातील कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असताना रुग्णांवर उपचार करत असताना रेमडसिवीर इंजेक्शनचा तुटवडा व अपुरा ऑक्सिजन पुरवठा यामुळे शासकीय तथा खासगी कोव्हिड सेंटरला देखील रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत.

या अडचणी लक्षात घेऊन लवकरच पुरवठा सुरळीत होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी दिली.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी बुधवारी सकाळी शिर्डी येथील नव्यानेच सुरू झालेल्या अयोध्या कोव्हिड सेंटरला सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. डॉ सुजय विखे पाटील यांना राहाता तालुक्यातील सर्व खाजगी कोव्हिड सेंटरला लवकरात लवकर रेमेडेसिवीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी डॉ. स्वाधीन गाडेकर व डॉ. प्रशांत गोंदकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

सदर भेटीत अयोध्या कोव्हिड सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या तब्येतीची खा. डॉ. विखे पा. यांनी विचारपूस केली आणि रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा दिला. डॉ. प्रशांत गोंदकर यांनी अयोध्या कोव्हिड सेंटरची माहिती दिली असता खा. डॉ. विखे पा. यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक अशोक गायके, नगरसेवक नितीन कोते, अतुल गोंदकर आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com