टाकळी ढोकेश्वर |वार्ताहर|Takali Dhokeshwar

नगर जिल्ह्याचे हक्काचे पाणी व वीज पुणे जिल्ह्याचे पुढारी पळवीत असून पुण्याच्या पुढार्यांच्या विरोधात बंड करण्याची क्षमता असेल

तर पाणी व वीज प्रश्नावर बोलावे, अशी अप्रत्यक्ष टीका भाजपचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. निलेश लंके यांच्यावर केली आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे पत्रकार परिषदेमध्ये खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुणे जिल्ह्यातील त्यांच्या सहकार्यांच्या विरोधात बंड करण्याची तयारी असेल तर या दोन्ही विषयांवर बोलावे. खा. डॉ. विखे पाटील यांनी त्यांच्यावर पलटवार केला असून पाणी प्रश्नाची लढाई शेतकर्यांसाठी असून यावर पक्षीय राजकारण न करता जनतेच्या भावनांशी खेळू नये. ही शेतकर्यांची लढाई असून पाण्याचा संघर्ष हा पुणे जिल्ह्याच्या विरोधात आहे.

पिंपळगाव जोगा धरणाच्या आवर्तनाबाबत पुणे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही, असे जाहीरपणे भाष्य करतात त्यावर लोकप्रतिनिधी बोलत नाहीत, गप्प का? असा सवालही खा. विखे पाटील यांनी केला आहे.त्यामुळे पक्ष आणि पद महत्त्वाचे का शेतकर्यांचे प्रश्न महत्त्वाचे? असा सवालही खा. विखे पाटील यांनी केला आहे.त्यामुळे या पाणी प्रश्नासंदर्भात कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा आमदारांवर माझी टीकाटिप्पणी नसून नगर-पुणे विरुद्ध नगरच्या पाणी प्रश्नाबाबत संघर्ष असून शेतकर्यांच्या बाजूने या लोकप्रतिनिधीने उभे राहून हिम्मत दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

त्यामुळे पिंपळगाव जोगा धरणातून शेतकर्यांना पाणी मिळत नाही म्हणून काही शेतकरी माझ्याकडे आले. शेतकर्यांचा पाणी प्रश्न महत्त्वाचा असून तो प्राणी प्रश्न सोडविण्यासाठी मी पुढाकार घेणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे. पिंपळगाव जोगा धरणातून अळकुटीसह इतर 8 ते 9 गावांतील शेतकर्यांना पाणी दिले जाते. त्या सर्व गावातील कालव्यांना कालवा निरीक्षक नसल्याचेही सांगितले. मी कोणावर अवलंबून नसून पारनेर तालुक्यातील शेतकर्यांचा पाणीप्रश्न माझ्या हिमतीवर सोडविणार असल्याचे खा. विखे यांनी सांगितले आहे.

धरण पुणे जिल्ह्यात निवेदन पारनेर तालुक्यात

पिंपळगाव जोगा धरण हे पुणे जिल्ह्यात असून या धरणातून पारनेर तालुक्यातील शेतकर्यांना पाणी मिळाले पाहिजे; परंतु लोकप्रतिनिधी पुणे जिल्ह्यात जाऊन आंदोलन करण्याऐवजी पारनेर तालुक्यात निवेदनाचे फोटो काढत असल्याचा आरोप खा. सुजय विखे पाटील यांनी करत.पाणी हे पिंपळगाव जोगा धरणातून येणार असून पाणी पारनेर तालुक्यातून पिंपळगाव जोगाकडे जाणार नाही तर पिंपळगाव जोगाकडून इकडे येणार आहे. त्यामुळे तिकडे पुणे जिल्ह्यात जाऊन आंदोलन करा, पारनेर तालुक्यात निवेदनाचे फोटो काढू नका, असा सल्लाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. निलेश लंके यांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.

9 एप्रिलच्या आवर्तनाबाबत शेतकर्यांची दिशाभूल

राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी 9 एप्रिल रोजी पिंपळगाव जोगा धरणातून तालुक्यातील शेतकर्यांना आवर्तन मिळेल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील शेतकर्यांना यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गरज पडते. याच्यासारखे दुर्दैव नसल्याची टीका खा. विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. वास्तविक पाहता गेल्या दीड महिन्यापासून आवर्तन सोडण्यात आले असून एक ठिपकाही पाणी पारनेर तालुक्यातील शेतकर्याला मिळाले नाही. परंतु पाणी प्रश्नावर मला राजकारण करायचे नसून आम्ही उपकार म्हणून पाणी मागत नाही तर आमच्या हक्काचे पाणी आम्ही मागत असल्याचे खा. विखे पाटील यांनी म्हटले आहे. पारनेर तालुक्यातील शेतकर्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे ही आग्रही भूमिका आमची यापुढील काळात राहणार आहे. त्यामुळे या आवर्तनासाठी जलसंपदा मंत्र्यांची गरज नसल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे हे काम आहे की, क्षेत्र नोंदणी प्रमाणे शेतकर्यांना पाणी मिळाले पाहिजे.